www.24taas.com, नागपूर
राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सिंचनाच्या पाण्यावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित चव्हाण यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. बाबा-दादा यांना धारेवर धरण्याची व्युहरचना केली आहे. त्यासाठी सिंचन घोटाळाचा प्रश्न उचलून धरण्यात येणार आहे.
दुष्काळामुळे राज्यातील पाणी आटले असले तरी सिंचन श्वे्तपत्रिकेत दावा केलेला पाणीसाठा कुठे आहे, असा सवाल अधिवेशनात उपस्थित होईल. विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनामानाट्यावर आणि पुन्हा मंत्रिमंडळात येणाबाबत आक्रमक धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे या अधिवेशान याबाबत तसेच अन्य प्रश्नांवर खडाजंगी होण्यीची शक्यता आहे.
सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत अजित पवार यांना क्लीन चीट म्हणजे राज्य सरकारने त्यांना अटक पूर्व जामीन दिल्याची टीका भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी नागपुरात केली आहे. सोमवारपासून सुरु होणारं हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची व्यवस्था मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अगोदरच केल्याचा टोमणाही त्यांनी लगावला. अजितदादांचा राजीनामा ही नौटंकी असून त्याची स्क्रिप्ट दादांनीच लिहिल्याची टीका भाजपचे प्रदेश महासचिव देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्यावर अविश्वाकस, तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर संपूर्ण अधिवेशनात बहिष्कार घालण्याचा विचार विरोधी पक्षांत सुरू आहे. सरकारच्या चहापान कार्यक्रमापासूनच याची झलक दिसेल, असा दावा विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे.
भारत आणि इंग्लड यांच्यातील चौथा कसोटी सामना १३डिसेंबरपासून नागपुरातच सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या मैदानात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात, तर क्रिकेटच्या मैदानात टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सामने रंगणार आहेत.
विरोधकांचे डावपेच उधळवून लावण्यासाठी सत्ताधारी संसदीय कार्यपद्धतीचा आणि सभागृहातील नियमांचा कठोर अवलंब करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मात्र, विरोधकांतील काही प्रमुख नेत्यांचा अजित पवारांच्यावरील बहिष्कार अस्त्राला विरोध असल्याचे समजते. याबाबत विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठकीत शिक्काचमोर्तब होणार आहे.