गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत ७ नक्षली ठार

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात सात नक्षलवादी मारले गेले आहेत. कोरची तालुक्यातील घनदाट जंगलात सोमवारी रात्री पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

Updated: Feb 18, 2014, 11:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात सात नक्षलवादी मारले गेले आहेत. कोरची तालुक्यातील घनदाट जंगलात सोमवारी रात्री पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
या चकमकीत सात नक्षलवादी मारले गेले, यात ५ पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. ही गोंदिया आणि गडचिरोली पोलिसांची संयुक्त कारवाई आहे.
सात नक्षलवाद्यांनी १६ तारखेला खुर्सापूर गावाच्या ग्रामपंचायतीत घुसून काही कागदपत्र जाळली होती. यानंतर आम्ही तपासासाठी चार टीम कोरची तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवल्या होत्या.
चकमकीआधी पोलिसांनी नक्षलावाद्यंना आत्मसमर्पण करण्याची विनंती केली होती. मात्र नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात नक्षलवादी मारले गेले.
चकमकीत मारल्या गेलेल्या सहा नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.
गडचिरोली-गोंदिया नॉर्थचा डिव्हिजन कमेटी मेंबर लालसू, लगीन तसेच पटलट नंबर ५६ चा कमांडर उमेश, वीरू तसेच चमको आणि रून्नीबाई या महिला नक्षलवाद्यांचा यात समावेश आहे. एकाची ओळख पटू शकलेली नाही,
घटनास्थळी पोलिसांनी एक एके-47, दोन एसएलआर रायफल, एक कार्बोईन, एक 303 गन, एक 12 बोअर बंदुक आणि एक पिस्तुल जमा केलं आहे.
गडचिरोली तालुक्यात मागील सात महिन्यात कोणतीही नक्षलवादी हालचाल नव्हती, खुर्सापूर ग्रामपंचायत जाळणे, हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.