www.24taas.com, वणी
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तुफानी स्वागत झालं. १५ ते २० हजार तरुण कार्यकर्त्यांच्या हजेरीत राज ठाकरे यांचे वणी येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला.
विदर्भातील दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मनसेचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आलेल्या वणी या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलि. वणी नगर परिषदेमध्ये मनसेने पहिल्याच दमात ८ उमेदवार निवडून आणून आघाडी घेतली सोबतच जि. प. आणि पंचायत समितीतही मनसेने वणीतून खाते खोलून आपली ताकद निर्माण केली. विधानसभेच्या निवडणुकीतही मनसेने चांगली कामगिरी केल्याने राज ठाकरेंच्या वाणी दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्व पक्षियांचे लक्ष लागले होते. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी राज ठाकरे यांनी भेट देणे व त्याला उत्स्फूर्त असा जंगी प्रतिसाद मिळणे ही मनसे च्या दृष्टीने चांगली बाब मानली जात आहे.
वणी येथे पदाधिकारी आणि नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांनी स्थानिक समस्या देखील जाणून घेतल्या. राज ठाकरे परवा १९ मार्च रोजी यवतमाळ येथे देखील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून ते दोन दिवस यवतमाळ येथे असतील.