www.24taas.com, झी मीडिया, अकोला
अकोला महापालिकेचे मनसेचे नगरसेवक राजेश काळे याला अखेर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीय. कार्तिक जोशी हत्येप्रकरणी राजेश काळे पाच दिवसांपासून फरार होता.
राजेश काळेनं आपल्या साथीदारांसह २१ मेरोजी कार्तिक जोशी याला पूर्व वैमनस्यातून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत कार्तिकच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याच्यावर खासगी रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अकोला पोलिसांनी यापूर्वीच सहा जणांना अटक केली होती. मात्र राजेश काळे हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याला शनिवारी अटक करण्यात आली. काळे हा अकोला महापालिकेतला एकमेव नगरसेवक आहे. तसंच तो अकोला शहरातून आगामी विधानसभेसाठी तयारी करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाईस टाळाटाळ केल्याचा आरोप कार्तिक जोशीच्या कुटुंबियांनी केलाय. अकोल्यात महिन्याभरात मनसेच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्याला अटक झालीय. गेल्या महिन्यात मनविसेचा अकोला महानगर अध्यक्ष ललित यावलकर याला चरसविक्री प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती.

• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.