विदर्भात सूर्य आग ओकतोय

चंद्रपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्याने अक्षरश: आग ओकायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर शहराच्या तापमानाने तर ४७.९ पर्यंत उसळी मारलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 20, 2013, 09:19 AM IST

www.24taas.com,झी मीडिया, चंद्रपूर
चंद्रपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्याने अक्षरश: आग ओकायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर शहराच्या तापमानाने तर ४७.९ पर्यंत उसळी मारलीये.
चंद्रपूर शहराची वाटचाल देशातील सर्वात उष्ण शहराकडे होत असल्याचे दाखवले आहे. शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होतायेत. आवश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर पडत असून बाहेर पडतानाही कान-चेहरा रुमालाने झाकण्याची काळजी घेत आहेत.
या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांची दैनंदिनीच बदलून गेली आहे. अनेकजण कुलरचा आधार घेतायेत. कडक उन्हामुळे अनेकजण आजारी पडतायेत. औद्योगिक प्रदूषण आणि अनिर्बंध खाणकाम याचा थेट परिणाम होत चंद्रपूर अधिकच उष्ण होत चाललंय.

नागपूरातही पा-याने ४७ अंश सेल्सियसचा टप्पा गाठलाय. मे महिन्य़ातल्या शेवटच्या ९ दिवसांकडे नागपूरकरांचं लक्ष लागलंय. मेमधले शेवटचे नऊ दिवस संत्रानगरीचं तापमान सर्वात जास्त असतं, असं मानलं जातं. जागतिक भूमंडलीय उष्मीकरण म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.