www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गोरेगावातल्या आरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय तयार करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयासाठी आरे कॉलेनीतली 190 एकर जमीन ताब्यात द्यायला मान्यता देण्यात आलीय.
आरे कॉलेनीतली ही 190 एकर जमीन कृषी विभागाच्या ताब्यात होती. या जमिनीचा ताबा महसूल आणि वन विभागाला द्यायला मान्यता देण्यात आलीय. या विभागाला आरेतला जमिनीचा ताबा मिळाल्यावर आरे कॉलनीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय बनवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
विधान परिषदेत वनमंत्री पतंगराव कदम यांनी प्रश्नोत्ताराच्या तासाला ही माहिती दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.