www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत पावसाचा कहर !
पावसामुळे मुंबापुरीला ब्रेक !
चाकरमान्यांचे झाले हाल !
मुंबईत सकाळपासूनचं मुसळधार पावसाला सुरुवात झाली... संततधार पावसामुळे धावणा-या मुंबईचा वेग मंदावला होता. दादारच्या हिंदमाता परिसरात तर अक्षरश: तळं साचलं होतं. त्यामुळे सकाळी कामागावर निघालेल्या नागरीकांना पाण्यातून वाट काढावी लागल होती. तसेच पाण्यातून वाहन पुढे नेण्याचा निर्णय अनेकांना महागात पडला.
मुंबई दिवसभर मुसळधार पावसाचा फटका सेंट्रल,वेस्टर्न आणि हार्बर अशा तिन्ही लोकल लाईन्सला बसला...त्यामुळे लोकलने प्रवास करणा-यांचे चांगलेच हाल झाले...दिवसभर पावसाने जराही उसंत न घेतल्यामुळे रस्ते वाहतूकीवरही त्याचा परिणाम झाला.
संततधार पाऊसामुळे कामावर जाणा-यांचे चांगलेच हाल झाले. मात्र काहींनी पावसाचा आनंद घेणं पसंत केलं. मरिन ड्राईव्ह परिसरात समुद्र किना-यावर पावसाचा आनंद घेण्यासाठी गर्दी झाली होती. कोणती दुर्घटना घडू नये यासाठी समुद्र किना-यावर पोलीस य़ंत्रणा सज्ज होती..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.