आत्महत्येसाठी घेतला व्हॉईस मेसेज आधार

आजची युवापिढी धीर न धरता टोकाचे पाऊल उचलत आहेत. आज अनेक जण छोट्याशा कारणांनी किंवा मनाविरूद्ध घटनांनी निशार होतात. झटपट मिळविण्याच्या नादात आपला जीव गमावून बसतात

Updated: Jun 25, 2013, 05:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
आजची युवापिढी धीर न धरता टोकाचे पाऊल उचलत आहेत. आज अनेक जण छोट्याशा कारणांनी किंवा मनाविरूद्ध घटनांनी निशार होतात. झटपट मिळविण्याच्या नादात आपला जीव गमावून बसतात. अशीच एक मुंबईत धक्कादायक बाब उघड झालेय. त्याने निराशेपोटी व्हॉईस मेसेज आधार घेऊन आत्महत्या केली.

याआधी एक आत्महत्या वेबकॅमसमोर झाली होती. त्यानंतर फेसबुकचा वापर आणि आता व्हॉईस मेसेज पाठवून झाली आहे. अनेकांनी याआधी चिठ्ठी लिहून आत्महत्या करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झालेय. आता तर त्याही पलिकडे जाऊन आता फेसबुक, वेबकॅम, व्हॉईस मेसेज पाठवून आत्महत्या करण्याच प्रमाण वाढत चाललयं. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
चिंचपोकळी येथील एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या भावाला व्हॉईस मेसेज पाठवल्यानंतर आत्महत्या केलीय. आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव कल्पेश राऊत आहे. हा तरुण जाहिरात एजन्सीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होता. शुक्रवारी तो घराबाहेर पडला. त्यानंतर त्यांने काही वेळाने एक व्हाईस मेसज पाठविला. हा मेसेज वाचून भावाच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांने क्षणाचा विचार न करता पोलिसांना फोन केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यापूर्वी त्याच्या भावाने आपले जीवन संपविले होते.

कल्पेशच्या भावाच्या मोबाईल फोनवर एक व्हॉईस मेसेज आला ज्यात लिहिले होते की, मी स्वत:ला संपवत आहे. या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये. हा मेसेज कल्पेशने पाठवला होता. मेसेजमध्ये पाण्याचा आवाज येत असल्यामुळे कल्पेश हाजीअलीजवळ असल्याचा अंदाज भावाला आला. असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तसा शोध घेतला. वरळी पोलिसांनी समुद्रकिनाऱ्याचा परिसर पिंजून काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी वरळी येथील तटरक्षकाच्या मुख्यालयाजवळ त्याचा मृतदेह आढळला. वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू पाण्यात बूडून झाल्याचेच स्पष्ट झाले. कल्पेशच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.