मुंबई : उद्योगपती अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून त्यांना 'वाय' दर्जाची 'व्हीव्हीआयपी' सुरक्षा देण्यात आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना देखील बर्याच वर्षांपासून 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आलीआहे. केंद्रीय सुरक्षा पथकाकडून तयार करण्यात आलेल्या एका अहवालात नीता अंबानी यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ही सुरक्षा देण्यात आली आहे.
नीता अंबानी यांच्या सुरक्षेसाठी १० सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तर झेड दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत ४० सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येतात. देशातत सीआरपीएफकडून झेड आणि वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येते. देशात केवळ ५८ व्हीव्हीआयपी व्यक्तींना झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.