www.24taas.com,मुंबई
ICE हे सॉफ्टवेअर महिलांनी जास्तीत जास्त डाऊनलोड कराव, यासठी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला खरा, मात्र हे सॉफ्टवेअर किती महिलांनी डाऊनलोड केलंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं नसल्याचं सांगितलंय खुद्द मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी.त्यामुळे मुंबई पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी खरंच संवेदनशील आहेत का, असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
ICE हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आलेल मोबाईल सोफ्टवेअर किती महिलांनी डाउनलोड केल याच्याशी मुंबई पोलिसांना काहीच देण घेण नाहीये, हे आम्ही म्हणत नाहीये तर हे म्हणणंय मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग याचं. दिल्ली मध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर मोठा गाजावाजा करत, यावर्षाच्या सुरुवातीला म्हणजे ५ जानेवारीला मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनीच महानायक अमिताभ बच्चन यांच्या मार्फत इन केस ऑफ इमर्जन्सी म्हणजेच ICE हे मोबाईल सोफ्टवेअर लॉंच केलं.
पण आता त्यांचं हे वक्तव्य आपल्या भुवया उंचावणार ठरतंय. या सोफ्टवेअरमुळे एखादी महिला अडचणीत असल्यानंतर तिच्या मोबाईलवरून "आय एम इन ट्रबल" असा एस एम एस मुंबई पोलिसांना येतो. आणि त्यामुळे पिडीत महिला कुठे आहे हे मुंबई पोलिसांना काही क्षणातच समजेल. इतकं महत्त्वाचं सोफ्टवेअर महिला का डोऊणलोड करत नाहीत, याबाबत सत्यपाल सिंग यांच्यासह ज्या नास्कोमनं हे सॉफ्टवेअर तयार केल त्यांच्याकडे तसंच सायबर सेलकडे याचं उत्तर नाहीये.