मुंबईतील रेल्वे महिलांची सुरक्षा रामभरोसेच

मध्य रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा रामभरोसेच आहे. मंगळवारी याचा अनुभव महिला पत्रकारालाही आला.

Updated: Apr 9, 2015, 12:00 PM IST
मुंबईतील रेल्वे महिलांची सुरक्षा रामभरोसेच  title=

मुंबई : मध्य रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा रामभरोसेच आहे. मंगळवारी याचा अनुभव महिला पत्रकारालाही आला.

मंगळवारी रात्री बाराच्या सुमाराला महिला पत्रकार मनिषा गुरव आपलं काम संपवून घरी डोंबिवलीत राहत्या घरी निघाल्या होत्या. गाडी कळवा स्थानकात आली असताना एका चोराने डब्यात शिरून त्यांचा मोबाईल पळवला. त्यावेळी त्यांची चोराशी झटापटही झाली. 

ही झटापट त्यांच्या जीवावरही बेतू शकली असती. विशेष म्हणजे रात्री महिला डब्यात सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. झटापट झाली त्यावेळी त्या डब्यात सुरक्षारक्षक नव्हता तो मागच्या डब्यात होता अशी अजब सारवासारव रेल्वे अधिका-यांनी केलीय. अज्ञात चोराचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून केला जात असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. 

विशेष म्हणजे असे प्रकार वारंवार कळवा मुंब्रा दरम्यान होत आहेत. मात्र पोलिसांना चोर सापडलेला नाही. याआधीही अशाच एका घटनेत एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.