मग, भुजबळ महिनाभर तुरुंगाबाहेर कुणाच्या सांगण्यावरून?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमधून कोणाच्या सांगण्यावरुन हलवलं? यातला गुंता आता अधिकच क्लिष्ट झालाय. 

Updated: Dec 9, 2016, 10:02 AM IST
मग, भुजबळ महिनाभर तुरुंगाबाहेर कुणाच्या सांगण्यावरून?  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमधून कोणाच्या सांगण्यावरुन हलवलं? यातला गुंता आता अधिकच क्लिष्ट झालाय. 

भुजबळांना जेजेतून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का आणि कोणाच्या सांगण्यावरून दाखल केलं गेलं याच्याशी जेजे रुग्णालयाचा काहीही संबंध नसल्याचा दावा, जेजेचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी न्यायालयात केला. मुंबई सत्र न्यायालयातल्या इडी कोर्टात भुजबळांची सुनावणी सध्या सुरु आहे.

दमानियांचा सवाल...

डॉक्टर तात्याराव लहाने आणि आर्थर रोड जेलच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं छगन भुजबळ सतत तब्येतीच्या कारणावरुन जेलबाहेर राहत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. दोन ते तीन दिवसांत केल्या जाणाऱ्या चाचण्यांसाठी छगन भुजबळ महिनाभर जेजे किंवा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कसे राहतात? असाही सवाल अंजली दमानियांनी केलाय. जेजे आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असताना अनेक राजकीय मंडळी भुजबळांना भेटली. कोर्टाच्या परवानगी शिवाय भुजबळांना रूग्णालयात राजकीय मंडळी भेटलीच कशी? असा प्रश्नही दमानिया आणि ईडीच्या वकिलांनी केलाय.