काय असणार आहेत भाजप-सेनेत चर्चेचे मुद्दे

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात उद्या पासून सरकारमध्ये सामील व्हायचे की नाही याबाबत चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेत कोणकोणते मुद्दे असणार यावर आपण नजर टाकू या....

Updated: Nov 27, 2014, 05:24 PM IST
काय असणार आहेत भाजप-सेनेत चर्चेचे मुद्दे  title=

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात उद्या पासून सरकारमध्ये सामील व्हायचे की नाही याबाबत चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेत कोणकोणते मुद्दे असणार यावर आपण नजर टाकू या....

१)    भाजप 2:1 शिवसेना असा सत्तेतील वाटा असू शकणार आहे. 
२)    जागावाटपात घटक पक्षाला सामावून घेण्याचा भाजप प्रयत्न करणार
३)    चार मंत्रीपदे घटक पक्षाला देतांना दोन मंत्रीपदे सेनेच्या कोट्यात लादण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल
४)    उपमुखमंत्रीपद आणि गृहखाते सेनेला सोडण्यास भाजप अजुनही तयार नाही. पण सेना या पदांसाठी आग्रही आहे. 
५)    कृषि, सिंचन, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम अशी वादग्रस्त राहिलेली प्रमुख खाती भाजप सेनेकडे भाजप ढ़कलणार. तुम्हीच फेर चौकशी करा आणि कार्रवाई करा असा भाजपाचा सूर आहे. पर्यटन, सामाजिक न्याय अशी काही कमी महत्त्वाची खाते सेनेकडे देण्याची शक्यता आहे.
६)    भाजप मातोश्रीवर जाणार नाहीत, चर्चा त्रयस्थ ठिकाणी होईल असे भाजपनेते सांगत आहेत.
७)    भाजप आणि सेना यांच्यात काही आमदार आता जास्त ताणू नका अशा मनस्थितीत आहेत. सरकार अस्थिर होणं, पुन्हा निवडणुका, सत्तेपासून दूर राहणे कोणाला नको आहे . त्यामुळे आता बोलणी सुरू होत आहेत . अर्थात तुम्ही आता नमतं घेतलं असा दावा दोन्ही पक्षाकडून होत आहे.
८)    मात्र सेनेला पुन्हा चर्चा सुरु करत झुलवत ठेवण्याचा भाजपाच डाव आहे का अशी शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.