व्हॉट्सअॅपमुळे मिळाली हरवलेली मुलगी

अनेकदा सोशल मीडियाचा  वापर विघातक पद्धतीने केला जातो, मात्र हा वापर  विधायक पद्धतीने होऊ शकतो ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे . कांदिवली पोलिसांनी हरवलेल्या दोन वर्षाच्या मुलीला अवघ्या दीड तासात तिच्या वडिलांकडे सुपूर्द केले आहे. हे सगळे घडलं केवळ व्हॉट्सअॅपमुळे

Updated: Sep 12, 2014, 02:55 PM IST
व्हॉट्सअॅपमुळे मिळाली हरवलेली मुलगी   title=

मुंबई  (सुनील महाडेश्वर, कांदिवली) : अनेकदा सोशल मीडियाचा  वापर विघातक पद्धतीने केला जातो, मात्र हा वापर  विधायक पद्धतीने होऊ शकतो ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे . कांदिवली पोलिसांनी हरवलेल्या दोन वर्षाच्या मुलीला अवघ्या दीड तासात तिच्या वडिलांकडे सुपूर्द केले आहे. हे सगळे घडलं केवळ व्हॉट्सअॅपमुळे

साइबा ही दोन वर्षाची गोडस मुलगी कांदिवली पश्चिम येथील नव्वद फूट रोड गांधी नगर येथील साफी गल्ली येथे राहते.  मंगळवारी घराबाहेर खेळताना चुकली आणि तेथेच रडू लागली.  तिला एका व्यक्तीने लालजी पाडा पोलिस चौकीत नेऊन सोडले. त्यानंतर कांदिवली पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी तिचा फोटो कांदिवली पोलिसांचा ग्रुपवर टाकला.

या ग्रुपमध्ये पोलिस स्थानिक पत्रकार, मोहल्ला कमिटी, महिला समितीमधील लोक असल्यामुळे हा फोटो विभागात सर्वत्र पसरला. साइबाच्या वडिलांना तो एकाने दाखवला. त्यानंतर तत्काळ कांदिवली पोलिस ठाण्यात जाऊन साइबाच्या वडिलांनी साइबाला ताब्यात घेतले. 

या घटनेमुळे  पोलिसांची कर्तव्य दक्षता आणि आधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर कसा उपयोगी पडतो हे सिद्ध झाले आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.