पाहा, 'चिंधी चोर' डॉननं का दिली 'त्या' पत्रकाराची सुपारी

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला 'चिंधी चोर' म्हटलं म्हणून त्यानं सरळ सरळ एका पत्रकाराची सुपारी देऊन टाकली, असा खुलासा नुकताच पोलिसांनी केलाय. 

Updated: Sep 11, 2014, 04:29 PM IST
पाहा, 'चिंधी चोर' डॉननं का दिली 'त्या' पत्रकाराची सुपारी  title=

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला 'चिंधी चोर' म्हटलं म्हणून त्यानं सरळ सरळ एका पत्रकाराची सुपारी देऊन टाकली, असा खुलासा नुकताच पोलिसांनी केलाय. 

नुकतीच, मुंबई क्राईम ब्रान्चनं रवी पुजारी टोळीतल्या तीन जणांना अटक केली होती. एका इंग्रजी पत्रकाराची सुपारी घेऊन आलेले हे चौघे जण क्राईम ब्रान्चच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत ही माहिती उघड झालीय.   

रवी पुजारीबद्दल लिहिताना 'चिंधी चोर' हा शब्द वापरल्यानं डॉन भडकला होता. त्यामुळेच त्यानं या पत्रकाराला ठार करण्यासाठी सुपारी दिली होती, असं पोलिसांच्या चौकशीत या आरोपींनी उघड केल्याचं संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हा) सदानंद दाते यांनी सांगितलंय. मदन सोनकर, आशुतोष वर्मा आणि राम बहादूर चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 

या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर पत्रकारांनी मात्र या घटनेचा निषेध नोंदवलाय. ही गंभीर बाब असल्याचं 'मुंबई प्रेस क्लब'नं म्हटलंय. 
 
या आरोपींकडून एक रिव्हॉल्व्हर, पाच काडतूस, 11 सिमकार्ड आणि 'त्या' पत्रकाराच्या फोटोसहीत त्याच्या घर आणि ऑफीसचा नकाशाही सापडलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.