मुंबई : काँग्रेसनेही महापौरपदासाठी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिलीय. विठ्ठल लोकरे यांनी दुपारी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उपमहापौर पदासाठी विनिफ्रेड डिसूझा यांनी अर्ज दाखल केलाय.
काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर तिकडे सपाने महापौरपदाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पुरेसे संख्याबळ नसल्याने अर्ज भरणार नसल्याचे सपाचे नगरसेवक रईस शेख यांनी स्पष्ट केलंय. मात्र काँग्रेससोबत जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
भाजपाने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तरीही काँग्रेस मात्र ही निवडणूक लढविणार आहे. काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी विठ्ठल लोकरे आणि उपमहापौर पदासाठी विनिफ्रेड डिसूझा यांना उमेदवारी दिलेली आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.