पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; व्हिडीओमागचं 'व्हायरल सत्य'

धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ढोले यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. 

Updated: Sep 4, 2016, 07:42 PM IST
पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; व्हिडीओमागचं 'व्हायरल सत्य' title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ढोले यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ शंकर ढोले गंभीर जखमी झाले आहेत.

खालील व्हिडीओ प्रेमनाथ ढोले यांच्या नावाने पसरवला जातोय...

ढोले यांना मारहाण झाल्याचा हा व्हिडीओ असल्याचं सांगून, फेसबुकवर दुसऱ्या कोणत्या तरी अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सर्रास शेअर केला जात आहे. पण हा व्हिडीओ प्रेमनाथ ढोले यांचा नसल्याचं स्थानिक लोकांनी म्हटलंय.

आणखी माहिती खाली वाचा

एवढंच नाही, ज्या अधिकाऱ्याला जमावाकडून मारहाण होतेय, त्या अधिकाऱ्याच्या दंडावर महाराष्ट्र पोलिस दलाचा लोगो दिसत नाही, पण प्रेमनाथ ढोले हे जखमी अवस्थेत असताना त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यावेळी त्यांच्या दंडावर महाराष्ट्र पोलीस दलाचा लोगो होता. यामुळे हा व्हिडीओ इतर घटनेतील किंवा परराज्यातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेव्हा फेसबुक आणि व्हॉटस अॅपवर येणारा प्रत्येक व्हिडीओ अथवा माहितीची शहानिशा केल्याशिवाय तो मित्रांना पाठवू नका, यामुळे प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल संशय आणि संभ्रमाचं वातावरण पसरतं, अशा अफवा थांबवण्यासाठी कृपया असे व्हिडीओ मित्रांना पाठवू नका. नाहीतर तुमच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.