विनोद कांबळी भाजपच्या वाटेवर

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Updated: Feb 7, 2017, 09:30 PM IST
विनोद कांबळी भाजपच्या वाटेवर title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले कृष्णा हेगडे यांच्या प्रयत्नांमुळे कांबळी भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कांबळीच्या या नव्या इनिंगला सुरुवात होऊ शकते.

याआधी 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद कांबळीनं रिडालोसमधल्या लोकभारती पक्षाकडून विक्रोळीतून निवडणूक लढली होती. या निवडणुकीमध्ये विनोद कांबळीचा पराभव झाला होता.