हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे

मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय. 

Updated: Nov 14, 2014, 12:38 PM IST
हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे title=

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय. 

राणे समितीच्या सगळ्या शिफारशी रद्द करत उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला पूर्णत: स्थगिती दिलीय. तर मुस्लिमांच्या बाबतीत शिक्षणा आणि नोकरीच्या बाबतीत पुन्हा एकदा सरकारनं विचार करावा, असा सल्ला सरकारला दिलाय. 

यावर बोलताना, ‘हा निर्णय घेऊन उच्च न्यायालयानं गरीब मराठा आणि मुस्लिम समाजाला मिळणाऱ्या शिक्षण, नोकरी, विकास यांवर बोळा फिरवलाय... त्यांना अंधारात ढकलण्याचा हा निर्णय आहे’ अशी टीका मेटे यांनी केलीय. 

पण, न्यायालयानं ही स्थगिती नक्की कोणत्या मुद्यावर दिलीय, आरक्षण देताना काय त्रुटी राहिल्यात... हे निकाल हातात आल्यानंतर संबंधित वकिलांशी चर्चा करून आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी कोणता निर्णय घ्यायचा याचा निर्णय घेऊ, असं मेटे यांनी स्पष्ट केलंय.  

‘मराठा मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण आम्ही रद्द होऊ देणार नाही... वेळ पडली तर वरच्या कोर्टात जाऊ... कायद्यात बदल करावा लागला तर मुख्यमंत्री फडणवीसां यांना सांगून तसा बदल करून घेऊ... पण, मराठा आणि मुस्लिम समाजावर अन्याय होऊ देणार नाही’ असंही त्यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.