उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी विनायक मेटे मातोश्रीवर

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Updated: Jan 8, 2017, 09:12 PM IST
उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी विनायक मेटे मातोश्रीवर  title=

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत भाजपच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. माध्यमांसमोर मात्र मेटेनी तसं स्पष्ट विधान केलं नाही.

उलट सेना भाजपनं एकत्र निवडणूक लढवावी, 26 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकेच्या निवडणूकांमध्ये आमची जिथे ताकद जिथे आम्हाला जागा मिळाव्यात अशी मागणी मेटेंनी केली आहे. भाजपनं सन्मानानं वागणूक द्यावी असंही मेटेंनी जाता जाता म्हटलंय.