व्हिडिओ : ...अशी कोसळली पेटलेली गोकूळनिवास!

काळबादेवीतल्या गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या आगीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागलाय. 

Updated: May 15, 2015, 12:00 PM IST
व्हिडिओ : ...अशी कोसळली पेटलेली गोकूळनिवास! title=

मुंबई : काळबादेवीतल्या गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या आगीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागलाय. 

ज्या इमारतीनं तीन जिगरबाज अग्निशमन अधिकाऱ्यांचा जीव गेला ती इमारत कशी कोसळली ते आपण या व्हिडिओत पाहू शकता. जीवाची बाजी लावत अग्निशमन अधिका-यांनी ही आग विझवण्याचे प्रयत्न केले. आगीत आपले प्राण धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळंच कोणत्याही रहिवाशाच्या अथवा नागरिकाचा या घटनेत बळी गेला नाही.

तर दुसऱ्या व्हिडिओत मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर हे आपल्या अधिका-यांसह घटनास्थळाची पाहणी करायला गेले असता अचानक ही आग लागलेली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगा-याखाली देसाई, राणे आणि अमीन यांच्यासह मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकही अडकले...मात्र अग्निशमन कर्मचा-यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढले... नेसरीकर यांना बाहेर ओढण्यात यश आलं. मात्र तरीही ते या आगीत ५६ टक्के भाजले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.