रेल्वे प्लॅटफॉर्मजवळचा गटरावरचा स्लॅब कोसळून १५ प्रवासी जखमी

वसई रेल्वे प्लॅटफॉर्मजवळचा गटरावरचा स्लॅब अचानक तुटला. त्यामुळे जवळपास १५ प्रवासी जखमी झालेत. 

Updated: May 31, 2016, 11:32 AM IST
रेल्वे प्लॅटफॉर्मजवळचा गटरावरचा स्लॅब कोसळून १५ प्रवासी जखमी  title=

मुंबई : वसई रेल्वे प्लॅटफॉर्मजवळचा गटरावरचा स्लॅब अचानक तुटला. त्यामुळे जवळपास १५ प्रवासी जखमी झालेत. 

ऐन गर्दीच्या वेळी सकाळी अनेक प्रवासी या गटारावरच्या स्लॅबवर उभे होते. त्यातच आज पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्यानं जास्तच गर्दी होती. स्लॅब अचानक तुटल्याने गोंधळ उडाला.

या ठिकाणी उभ्या असलेल्या अनेकांना या रस्त्याखाली गटार असल्याचंही माहीत नव्हते. मात्र, हा रस्ता अचानक तुटला आणि त्यावरचे सगळे प्रवासी गटारात पडले. वसईच्या रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या जवळ ही घटना घडली.