मुंबई : मुंबईतल्या बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा येत असल्याची धक्कादायक कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेतील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बांधकाम व्यावसायिक आणि अंडरवर्ल्ड मधील साटंलोटंही मोडीत काढणार असल्यांचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. विरोधकांनी गृहविभागासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईतल्या बांधकाम व्यावसायात सध्या जे काही सुरु आहे त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
तसेच या व्यवसायात मोठ्या प्रमाणात अंडरवर्ल्डमधील लोक पैसा गुंतवत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.