सावधान ! मार्च एण्डमध्ये सुट्टयांचा तेरावा माहिना

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुट्ट्यांचा असल्यामुळे बँकेचे व्यवहार करायचे असतील तर नागरिकांनी पुढील आठवड्याच्या शुक्रवारी 27 मार्चपर्यंत उरकून घ्यावेत.

Updated: Mar 23, 2015, 11:02 PM IST
सावधान ! मार्च एण्डमध्ये सुट्टयांचा तेरावा माहिना title=

मुंबई : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुट्ट्यांचा असल्यामुळे बँकेचे व्यवहार करायचे असतील तर नागरिकांनी पुढील आठवड्याच्या शुक्रवारी 27 मार्चपर्यंत उरकून घ्यावेत.

शनिवारी (दि. 28) रामनवमी व (दि. 29) मार्च रोजी रविवार असल्यामुळे बँकांना दोन दिवस सलग सुट्ट्या असणार आहेत. 

सोमवारी (दि. 30) बँकाचे नियमित कामकाज असेल परंतू दोन दिवसांच्या सलग सुट्ट्यामुळे गर्दी राहणार आहे. मात्र 31 मार्च रोजी संपणा-या आर्थिक वर्षाची सुट्टी ही 1 एप्रिल रोजी असल्यामुळे बँका पूर्णपणे बंद राहतील.

यानंतर 02 एप्रिल रोजी महावीर जयंती व 03 एप्रिल रोजी गुडफ्रायडे असल्याने पुन्हा सलग दोन सुट्ट्या येणार आहेत. 04 एप्रिल रोजी पुन्हा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज अर्ध्या दिवसाचे असेल. तर 05 एप्रिल रोजी रविवार असल्याने पुन्हा बँका बंद राहणार आहेत. 

06 एप्रिलपासून बँकांचे कामकाज पूर्ववत चालू होईल. जर कोणाला बँकाचे महत्त्वाचे धनादेश द्यायचे असतील किंवा कोणतेही बँकाचे व्यवहार करायचे असतील तर त्यांनी शुक्रवार पर्यंत करावेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.