मुंबई : शहरातील घाटकोपर मेट्रो स्थानकात एक तरुणी बेशुद्ध पडली. मेट्रो स्थानकावरील स्वच्छता गृहात ही ही घटना मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिलेय.
मेट्रो स्थानकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहामध्ये ही तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तरुणी साकीनाका येथील रहिवाशी असून, मेट्रो स्थानकावरील कर्मचाऱयांना स्वच्छतागृहात पडलेल्या अवस्थेत आढळून आली.
तरुणीला नजीकच्या राजवाडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार सुरु करण्यात आला. ही तरुणी अंधेरी साकीनाका परिसरात रहाणारी असल्याचे समजते. दरम्यान, ती बेशुद्ध असल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तिने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची चर्चा होती. पोलिसांनी याचा इन्कार केलाय.