महापौर शिवसेनेचाच होणार - उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल, असा पुनरूच्चार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय.

Updated: Feb 25, 2017, 07:15 PM IST
महापौर शिवसेनेचाच होणार - उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार  title=

मुंबई : मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल, असा पुनरूच्चार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय.

मुंबई महापालिकेतल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक शनिवारी सायंकाळी शिवसेना भवनात पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं तसंच तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.  

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवकही यावेळी उपस्थित होते. शिवसेना तसंच अपक्ष मिळून एकूण 88 नगरसेवक बैठकीला हजर होते.

येत्या मंगळवारी शिवसेना आपल्या पक्षाचे नगरसेवक आणि सहयोगी नगरसेवक असे संख्याबळ नवी मुंबई कोकण भवन येथे नोंदणीचे पत्र देणार, असल्याचं समजतंय. यासाठी महापौर निवास येथे सर्व नगरसेवक एकत्र येऊन कोकण भवनला जाणार असल्याचं समजतंय.