उद्धव-मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे देवाणघेवाण - राणे

रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्यावरून चांगलंच राजकारण तापलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीमागे देवाण-घेवाण झाल्याचा थेट आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 3, 2013, 04:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्यावरून चांगलंच राजकारण तापलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीमागे देवाण-घेवाण झाल्याचा थेट आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री-राणे यांच्यातील नवा वाद सेनेमुळे उफाळण्यास मदत झालेय.
रेसकोर्सवर थीमपार्क उभारावं या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नीतेश राणे यांनी टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी विश्वासाहर्ता गमावलीय ते फक्त मुंबईकरांना स्वप्न दाखवतात, पण पूर्ण करत नाहीत असं सांगत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

या जागेवर रेसकोर्सच असावा आणि तो सुट्टीच्या दिवशी बघण्यासाठी खुला करावा असंही स्पष्ट मत नीतेश राणेंनी व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे देवाणघेवाणीचं राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
तसंच शिवसेना राज ठाकरेंनी ताब्यात घ्यावी, उद्धवना ती चावलता येत नाही अशीही घणाघाती टीका नीतेश राणेंनी केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.