ठाकरे बंधू पुन्हा निघाले महाराष्ट्र दौऱ्यावर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानंतर ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

Updated: Nov 13, 2014, 12:00 PM IST
ठाकरे बंधू पुन्हा निघाले महाराष्ट्र दौऱ्यावर...  title=
फाईल फोटो

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानंतर ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

उद्धव ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे तर राज ठाकरे १८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत.

शिवसेना विरोधी बाकांवर बसल्यानंतर उद्धव यांचा हा पहिलाच राज्यव्यापी दौरा असणार आहे. १८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान ते राज्यभरात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. भाजपबरोबर सत्तासहभागाचं नेमकं काय झालं आणि शिवसेनेनं यासंदर्भात घेतलेली भूमिका ते शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगणार आहेत. 

तर दुसरीकडे विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर १८ नोव्हेंबरपासून निघणार आहेत. राज यांची मुलगी उर्वशी ठाकरे हिला अपघात झाल्यामुळे राज ठाकरेंनी हा दौरा पुढे ढकलला होता. आता १८ नोव्हेंबरला पिंपरी-चिंचवड, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे असा त्यांचा साधारण पंधरा दिवसांचा दौरा राहणार आहे.     

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.