'वाचवा.. वाचवा'; मुकेश अंबानींच्या विमानातून मिळाला संदेश!

भारताचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या विमानामधून ‘वाचवा’ असा संदेश आल्यानंतर एकच धावपळ उडाली... सोमवारी रात्री ८.३२ वाजता मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मॅसेज आला होता... ‘mayday’… म्हणजेच, ‘वाचवा... वाचवा’…

Updated: Nov 13, 2014, 09:43 AM IST
'वाचवा.. वाचवा'; मुकेश अंबानींच्या विमानातून मिळाला संदेश! title=

मुंबई : भारताचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या विमानामधून ‘वाचवा’ असा संदेश आल्यानंतर एकच धावपळ उडाली... सोमवारी रात्री ८.३२ वाजता मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मॅसेज आला होता... ‘mayday’… म्हणजेच, ‘वाचवा... वाचवा’…

जेव्हा एखादं विमान एखाद्या अपघाताला सामोरं जाणार असेल तेव्हा मदतीसाठी ‘mayday’ हा संदेश धाडला जातो. सोमवारीही एका विमानातून हाच संदेश मिळाला... आणि अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली.

‘एअरबस ३१९’ या एका खाजगी विमानातून पहिल्यांदा ८.३२ आणि दुसऱ्यांदा ८.३८ ला ‘वाचवा... वाचवा’ असा संदेश मिळाला... ‘पहिल्या संदेशात विमानाच्या इंजिनला आग लागलीय आणि विमान खाली कोसळतंय... हे विमान दिल्लीहून लाहोरमार्गे मस्कटला जात आहे...’ असं पायलटनं म्हटलंय. हे विमान मुकेश अंबानी यांच्या मालकीचं आहे, हे ‘एटीसी’ला समजतंय तेव्हाच दुसरा संदेशही येऊन धडकला होता. ‘विमानाला आग लागलीय... विमान समुद्रात कोसळतंय’ असं या दुसऱ्या संदेशात म्हटलं गेलं. 

पण, दिल्ली आणि मस्कट दोन्ही ठिकाणांहून परिस्थिती सामान्य असल्याची माहिती मिळाली. एव्हान एटीसीनं रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून विमान शोधून काढलं होतं... पण, हा संदेश एटीसीला त्यांच्या नजिक उभ्या असलेल्या खाजगी विमानांच्या जागेतूनच मिळतोय, असं समजलं तेव्हा ते कोड्यात पडले.  
 
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, २००७ साली नीता अंबानी यांना त्यांचे पती मुकेश अंबानी यांनी हे विमान भेट म्हणून दिलं होतं... हे विमान हॅंगरमध्येच उभं होतं... चौकशी केल्यानंतर समजलं की कदाचित पायलट या रेडिओ सिग्नलची तपासणी करत होता... पण, आपण टेस्टिंग करतोय हे एटीसीला कळविण्यात तो विसरला होता.  

एटीसी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वेळोवेळी विमानांची तपासणी होत असते.... पण, त्यापूर्वी तशी सूचना एटीसीला दिली जाते. त्यामुळे, संभ्रम टळतात... ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन’ या घटनेची अधिक चौकशी करत आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.