मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेनंही दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करण्याची धावाधाव सुरू केलीय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त ११ सप्टेंम्बर पासून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
अधिक वाचा - शेतकऱ्यांना कमी पडू देणार, कर्ज काढू : मुख्यमंत्री
दुष्काळासंदर्भात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची मातोश्रीवर बैठक घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त भागावर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश सर्व मंत्र्यांना दिले.
तसंच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. पाणी पुरवठा, अन्न आणि जनावरांना चारा या जीवनावश्यक गोष्टी प्राधान्याने पुरवण्याचे आदेशही दिलेत.
अधिक वाचा - राज्यात दुष्काळ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उधळतायेत पैशाच्या नोटा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.