मुंबईत पोलीस ठाण्यात दोन मॉडेलचा धिंगाणा

मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात मॉडेल पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता नावाच्या मॉडेलने हैदोस घातला. विनयभंगाची तक्रार देण्यास आलेल्या या दोन्ही मॉडलचा पोलिस स्टेशनला येताच सूर बदलला आणि त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच आरोप करण्यास सुरुवात केली. 

Updated: May 29, 2015, 02:32 PM IST
मुंबईत पोलीस ठाण्यात दोन मॉडेलचा धिंगाणा title=

मुंबई : मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात मॉडेल पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता नावाच्या मॉडेलने हैदोस घातला. विनयभंगाची तक्रार देण्यास आलेल्या या दोन्ही मॉडलचा पोलिस स्टेशनला येताच सूर बदलला आणि त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच आरोप करण्यास सुरुवात केली. 

या मॉडेल्सनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्का बुक्की केली. रात्री एटीएममधून पैसे काढत असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांची छेड़ काढली. त्यानंतर या दोघींनी पोलिसांना फोन केला. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. पोलिसानी मॉडेलला पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले. मॉडेल पोलीस ठाण्यात पोहोचल्या. 

पोलीस आरोपीना घेऊन पोलीस ठाण्यात आले. मात्र पकडलेल्यां आरोपींवरून पोलीस आणि मॉडेल्समध्येच जुंपली. या मॉडेल्सनं शिविगाळ करत महिला पोलिसांना मारहाण देखील केली. या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाहा व्हिडिओ - 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.