मुंबई: भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा स्टंट अखेर फसलाय. समाजवादी पार्टी आणि मुस्लीम महिला संघटनांनी तृप्ती देसाईंच्या दर्गा प्रवेशाला जोरदार विरोध केला.
हाजी अली दर्गा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळं पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र तरीही तृप्ती देसाई या हाजी अली परिसरात दाखल झाल्या. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्ह निर्माण झाल्यामुळं अखेर तृप्ती देसाईंनी काढता पाय घेतला.
त्यामुळे शनिशिंगणापूर आणि कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात यशस्वीरीत्या प्रवेश करणा-या देसाईंचा मुंबईतला स्टंट मात्र फसल्याची चर्चा आहे.