छोटा राजनबद्दलच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी!

अँडरवर्ल्ड डॉन एक मोठा गँगस्टर म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या राजेंद्र सदाशिव निकाळजे याला अखेर पोलिसांनी अटक केलीय. इंडोनेशियामधील बाली इथं त्याला पकडण्यात आलं. छोटा राजनचा जन्म ६ डिसेंबर १९५९ रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झाला, तिथंच तो वाढला.

Updated: Oct 26, 2015, 02:57 PM IST
छोटा राजनबद्दलच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी! title=

मुंबई: अँडरवर्ल्ड डॉन एक मोठा गँगस्टर म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या राजेंद्र सदाशिव निकाळजे याला अखेर पोलिसांनी अटक केलीय. इंडोनेशियामधील बाली इथं त्याला पकडण्यात आलं. छोटा राजनचा जन्म ६ डिसेंबर १९५९ रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झाला, तिथंच तो वाढला.

जाणून घ्या छोट्या राजनबद्दलच्या पाच गोष्टी 

१. मूळचा फलटण जिल्ह्यातील गिरवी गावचा ८० च्या दशकात सहकार सिनेमाबाहेर ब्लॅकमध्ये तिकीट विकायचा. त्यानंतर छोटे-मोठे गुन्हे करताना राजेंद्र निकाळचे बडा राजनच्या संपर्कात आला दाऊदच्या टोळीचा सदस्य होता.

२. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा उजवा हात म्हणून छोटा राजनला ओळखलं जात होतं. मात्र त्यांच्यात वाद झाल्यानंतर दाऊद आणि छोटा राजन वेगळे झाले. 

३. मुंबईतील १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी स्फोटानंतर दाऊद आणि राजन यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. हा स्फोट घडवणाऱ्या आरोपींची हत्या केल्याचा आरोप छोटा राजनवर आहे. 

४. ५५ वर्षीय छोटा राजन १९८६ पासून फरार आहे. गेल्या दोन दशकांपासून इंटरपोल त्याचा कसून शोध घेत होते. अखेर त्याला १९९५ मध्ये 'मोस्ट वॉन्टेड' म्हणून घोषीत केलं होतं.

५. ज्येष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे डे यांच्या हत्येमागेही छोटा राजनचा हात असल्याचा आरोप आहे.

आणखी वाचा - मोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.