अनधिकृत बॅनर हटवण्यासाठी टोल फ्री नंबरवर कॉल करा

मुंबईत अनधिकृत बॅनर जे शहराचे सौंदर्य खराब करतायत, पण कुणाकडे कशी तक्रार करायची हे माहित नसेल तर आता फक्त एक टोल फ्री नंबर लक्षात ठेवा, आणि या नंबरवर अनधिकृत होर्डिंग्जची तक्रार करा. 

Updated: Jan 14, 2015, 01:31 PM IST
अनधिकृत बॅनर हटवण्यासाठी टोल फ्री नंबरवर कॉल करा title=

मुंबई : मुंबईत अनधिकृत बॅनर जे शहराचे सौंदर्य खराब करतायत, पण कुणाकडे कशी तक्रार करायची हे माहित नसेल तर आता फक्त एक टोल फ्री नंबर लक्षात ठेवा, आणि या नंबरवर अनधिकृत होर्डिंग्जची तक्रार करा. 

अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि जाहिरात फलकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आता टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. अंधेरी आणि बोरीवली या तालुक्यांसाठी १८००२२०१३६ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला असून, नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे.

जाहिरात फलक, साइनबोर्डस बॅनर्स उभारून होत असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी, एक जनहित खाचिका दाखल करण्यात आली, या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या ही सोय अंधेरी आणि बोरिवली तालुक्यासाठी असली तरी मुंबईत इतर तालुक्यांसाठी ही सुविधा कधी उपलब्ध होईल असा सवाल केला जात आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.