निवडणूक उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ

राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ५ लाखांहून वाढवून १० लाख रुपयेपर्यंत केली आहे. २०११ मध्ये उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. 

Updated: Jan 31, 2017, 10:58 PM IST
निवडणूक उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ title=

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ५ लाखांहून वाढवून १० लाख रुपयेपर्यंत केली आहे. २०११ मध्ये उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. 

मात्र, आता वाढत्या महागाईमुळे सर्वच गोष्टींचा खर्च वाढल्याने मर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना निवडणुक प्रचारादरम्यान ५ लाख रुपयांमध्ये सर्व गोष्टींचे नियोजन करणे कठीण जाऊ शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन निव़डणुक खर्चात वाढ करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती.

राजकीय पक्षांची मागणी विचारात घेऊन त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी परीपत्रक काढून निवडणूक खर्चात वाढ केल्याची घोषणा केली. ही वाढ थेट १० लाख रुपये करण्यात आली आहे.