शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले

शेतमालाच्या हमीभावासाठी विरोधकांसह शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले. 

Updated: Mar 31, 2015, 07:42 PM IST
शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले title=

मुंबई : शेतमालाच्या हमीभावासाठी विरोधकांसह शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले. 

सरकारनं सर्व शेतक-यांना न्याय द्यायला  हवा अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. तर उसाला मदत द्यायला विरोध नाही मात्र कापूस, सोयाबिन आणि धानालाही मदत देण्याची मागणी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांनी केली. 

सर्वच पिकांचे भाव ग़डगडले असून किमान आधारभूत किंमत देण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी केली.  तर जोपर्यंत सरकार या प्रश्नावर ठोस निर्णय घेत नाही तोवर सभागृहाच्या कामकाजात भाग घेणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवारांनी यावेळी केली. 

उसाला एफआरपीप्रमाणं दर देण्यासाठी काही अडचण असल्यास सरकार मदत करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणस यांनी दिले. मात्र, विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.