मुंबईच्या दिनेशचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड!

तुम्हाला टोमॅटो कॅच अप कुणी प्यायला सांगितलं तर... तर कदाचित टोमॅटो कॅच अप खातात की पितात? असा प्रश्न तुम्हाला पडेल... पण, मुंबईचा एक व्यक्ती मात्र टोमॅटो कॅच अप पिऊ शकतो... नव्हे त्यानं आपलं हे अनोखं टॅलेंट दाखवून एक नवीन रेकॉर्ड कायम केलाय.

Updated: Jul 29, 2015, 10:03 AM IST
मुंबईच्या दिनेशचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड! title=

मुंबई : तुम्हाला टोमॅटो कॅच अप कुणी प्यायला सांगितलं तर... तर कदाचित टोमॅटो कॅच अप खातात की पितात? असा प्रश्न तुम्हाला पडेल... पण, मुंबईचा एक व्यक्ती मात्र टोमॅटो कॅच अप पिऊ शकतो... नव्हे त्यानं आपलं हे अनोखं टॅलेंट दाखवून एक नवीन रेकॉर्ड कायम केलाय.

मुंबईचा रहिवासी असणारा ३८ वर्षांच्या दिनेश उपाध्यायनं अर्धा किलो टोमॅटो कॅच अपची पूर्ण बाटलीचं तोंडाला लावून फस्त केली... तेही केवळ ३९.८५ सेकंदात.... या ५०० ग्रॅमच्या बाटलीत ४५३ ग्रॅम कॅचअप होतं.

हे आपलं जगावेगळं टॅलेंट दाखवून दिनेशनं वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावार नोंदवलाय. यापूर्वी जर्मनीच्या वेनीडिक्ट वीवर यानं ३९६ ग्रॅम कॅच अप ३२.३७ सेकंदात पिऊन रेकॉर्ड कायम केला होता. 

दिनेशनं आपल्या याच टॅलेंटच्या साहाय्यानं यापूर्वी ४८ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही बनवलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.