मुंबई : भाजप-शिवसेना युती तुटल्याबद्दल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दुर्दैवी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आदित्य ठाकरे यांचे काही ट्विट -
- शिवसेनेने नेहमी भाजपच्या वाईट काळात साथ दिली होती. पण राज्यातील भाजपने २५ वर्षाची युती तोडण्याचा निर्णय घेतला हा खूप खेदजनक आहे.
- या युतीला माननीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद काकाच्या विचारांनी आणि विकासाच्या धोरणांनी बनवले होते. शिवसेना-भाजप युती हा राजकीय नव्हती, हे एक कुटुंब होते जे माझे आजोबा, प्रमोद काका, अटल जी आणि अडवाणीजींनी उभे केले होते.
- माझ्या जन्माच्या अगोदरपासून ही युती होती. मी भाजप नेते आणि सदस्यांच्या एकीकरणाच्या वातावरणात वाढलो. याच्या खूप आठवणी आहेत.
- एकीकरण आणि कुटुंबिक एकोपा माझ्या लहानपणापासून पाहत आहे. याचा एक लहान मुलगा सदैव साक्षीदार असणार आहे.
- या युतीने अनेक चढ उतार, आव्हाने आणि आंदोलनं पाहिलीत, पण त्याला आम्ही एकत्रपणे समोरे गेलो, यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ समोर ठेवला नाही.
- गेल्या पाच दिवसांपासून यावर कोणतेही भाष्य करण्याचे मी टाळले होते. भाजपच्या काही स्वार्थी नेत्यांना माझे वय दिसले पण युती टिकवण्यासाठी तळमळ दिसली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.