काँग्रेस-राष्ट्रवादीचा १५ वर्षांचा संसार मोडीत

भाजप शिवसेनेच्या युती पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून काँग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत.

Updated: Sep 25, 2014, 08:31 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीचा १५ वर्षांचा संसार मोडीत title=

मुंबई : भाजप शिवसेनेच्या युती पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून काँग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत.

घटस्थापनेच्या दिवशी युती आणि आघाडीचा महाराष्ट्रात घटस्फोट झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीने आपण सर्व 288 जागा लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद लक्षात घेऊन आम्ही निम्या जागा मागितल्या, तरी या गंभीर बाबीकडे कुणी लक्ष दिलं नाही, तरी आम्ही समाधानी होतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.