www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोलविरोधी आंदोलनात झालेल्या नुकसानीची भरपाई राज ठाकरे यांनी दिली नाही तर आम्ही निवडणूक आयोगाला याची माहिती देऊ तरीही भरपाई दिली नाही तर कराची वसुली करतात तशी त्यांची मालमत्ता जप्त करून वसूली केली जाईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांनी टोलमध्ये पारदर्शकता येणार नाही तोपर्यंत टोल भरणार नाही, असे नवी मुंबईतील कार्यक्रमात जाहीर केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर तोडफोड केली होती.
या टोल नाक्यांच्या तोडफोडी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नुकसान भरपाईची नोटीस देण्यात आली होती. त्यावर आपण घंटा पैसे देणार असे राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत प्रतिक्रिया दिली होती.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आर. आर. पाटील यांना राज ठाकरे आंदोलनातील नुकसान भरपाईबद्दल प्रश्न विचारला त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोलविरोधी आंदोलनात झालेल्या नुकसानीची भरपाई राज ठाकरे यांनी दिली नाही तर आम्ही निवडणूक आयोगाला याची माहिती देऊ तरीही भरपाई दिली नाही तर कराची वसुली करतात तशी त्यांची मालमत्ता जप्त करून वसूली केली जाईल.
कोणीच नाराजी व्यक्त केली नाही
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीबाबत माझ्याजवळ कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी मेरीट हाच महत्त्वाचा निकष आहे.
सेवा ज्येष्ठतेनुसार ही नियुक्ती होत नाही असं आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय. मात्र विजय कांबळे हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. ते सात दिवसात हजर होतील. त्यांची मी स्वतः समजूत घालेन असं गृहमंत्री म्हणाले.
आर.आर. पाटील यांचा इशारा
नियमानुसार सात दिवसांत रूजू न झाल्यास वेगळा विचार करणार असा इशारा गृहमंत्री आर आर पाटील यांनी विजय कांबळे आणि अहमद जावेद यांना दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.