सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे

आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देताना कोर्टानं नारायण राणे समितीवरही ताशेरे ओढलेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत बाजू नीट मांडली नाही, अशी टीका आज नारायण राणेंनी केली. 

Updated: Nov 14, 2014, 07:31 PM IST
सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे title=

मुंबई : आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देताना कोर्टानं नारायण राणे समितीवरही ताशेरे ओढलेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत बाजू नीट मांडली नाही, अशी टीका आज नारायण राणेंनी केली. 

सरकार सुप्रिम कोर्टात गेलं नाही तर आम्ही सुप्रिम कोर्टात जाऊ, असं राणे म्हणाले. या संदर्भात कॅव्हेट आम्ही दाखल केलं होतं असंही राणे म्हणाले.
 
काँग्रेसने अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून उमेदवारी मागे घेणं ही चूक होती, असं वक्तव्य करत राणे यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा 'ना घर का ना घाट का' अशा स्थितीत असल्याची टीकाही केलीय. 

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाचा आदर करावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलीय. सरकारने याबाबत आता योग्य तो मार्ग काढावा, असंही पवारांनी सुचवलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.