विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलन मागे

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या 1628 शाळांना फायदा होणार आहे. राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Jun 14, 2016, 05:54 PM IST
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलन मागे title=

मुंबई : विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या 1628 शाळांना फायदा होणार आहे. राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या 13 दिवसांपासून राज्यभर विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू होते. निर्णयामुळे राज्यातल्या 90 टक्के विनाअनुदानित शाळांना फायदा होणार आहे. मात्र याचा राज्याच्या तिजोरीवर 164 कोटींचा बोजा पडणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून राज्याच्या विविध भागात 15 हजार शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं होतं. 

औरंगाबादेत आंदोलन सुरुच

राज्य सरकारनं दिलेले 20 टक्के अनुदान मान्य नसल्याचं आंदोलनकर्ते शिक्षक सांगताय. जोपर्यंत 100 टक्के अनुदान मिळणार नाही तोपर्यंत औरंगाबादेत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं शिक्षकांनी सांगितलय.