भाडेवाढ मागे घ्या नाहीतर परिणाम वाईट, सरकारला धमकी

टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ ४८ तासांत मागं घेतली नाही तर सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ग्राहक पंचायतीनं दिलाय.

Updated: Oct 19, 2012, 11:06 AM IST

www.24taas.com, मुंबई
टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ ४८ तासांत मागं घेतली नाही तर सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ग्राहक पंचायतीनं दिलाय. मुंबई आणि एमएमआरडीएच्या हद्दीत करण्यात आलेली भाडेवाढ ही अन्यायकारक असल्याचं मुंबई ग्राहक पंचायतीचं म्हणणं आहे.
भाडेआकारणी करताना सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा विचार केला नाही. शिवाय इलेक्ट्रॉनिक मीटरच्या दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील भाडेआकारणीवरही ग्राहक पंचायतीचा आक्षेप आहे.
तसंच जोपर्यंत सर्व रिक्षा आणि टॅक्सीचे मीटर इलेक्ट्रॉनिक होत नाही तोपर्यंत नवी भाडेवाढ लागू करु नका असं ग्राहक पंचायतीनं म्हटलय.