लालबागच्या राजाला ती मुलगी मद्यपान करून आलेली - निलंबित पोलिस

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्हीआयपी रांगेत घुसलेली मुलगी ही मद्यपान करून आल्याचा आरोप निलंबित पोलिसांनी केला आहे. 

Updated: Sep 30, 2015, 11:33 PM IST
लालबागच्या राजाला ती मुलगी मद्यपान करून आलेली - निलंबित पोलिस title=

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्हीआयपी रांगेत घुसलेली मुलगी ही मद्यपान करून आल्याचा आरोप निलंबित पोलिसांनी केला आहे. 

महिला पोलिस हवालदार वर्षा पाटील आणि अनुराधा साळुंखे यांना एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी व्हीआयपी दर्शनाच्या रांगेल घुसलेल्या मुलीला त्यांनी मारहाण केली असा त्यांच्यावर आरोप आहे. ही घटना शुक्रवारी २५ सप्टेंबर २०१५ रोजी घडली होती.

निलंबित महिला पोलिस टीव्ही मीडियासमोर बोलतांना म्हणाले, त्यांना चुकून टार्गेट करण्यात आले आहे, त्याच्यावरील निलंबनाच्या कारवाई बाबत त्या नाराज आहेत.

निलंबित महिला पोलिसांनी आरोप करतांना म्हटलं आहे, "त्या मुलीच्या तोंडाचा मद्याचा वास येत होता. त्या मुलीने आणि तिच्या आईने पहिल्यांदा आमच्यावर हल्ला केला, आमचे केस आणि युनिफॉर्म ओढला".

नंदीनी गोस्वामी या मुलीला महिला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मारहाणीचा व्हिडीओ वेब मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे.

"या मुलीने जेव्हा आमच्यावर हल्ला केला, तेव्हा स्वत:च्या रक्षणासाठी आम्ही हात उचलला, आम्हीही माणसं आहोत, मग पोलिस, आम्हाला कुणी मारून घेईल, हे कसं होऊ शकतं", असं महिला पोलिसाने म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.