...जेव्हा मुंबई मेट्रोच्या टपावरून प्रवास करताना दिसले राम, लक्ष्मण, सीता!

मुंबई मेट्रोवर भगवान श्रीराम आपले बंधु लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासोबत प्रवास करताना तुम्ही पाहिलेत का?

Updated: Nov 12, 2015, 04:29 PM IST

मुंबई : मुंबई मेट्रोवर भगवान श्रीराम आपले बंधु लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासोबत प्रवास करताना तुम्ही पाहिलेत का?

https://pbs.twimg.com/media/CTiEoksUwAA9DfW.jpg
मुंबई मेट्रोची जाहिरात

नसेल तर इथे... पाहा... ही दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या मुंबई मेट्रोच्या एका जाहिरातीत हे दृश्यं पाहायला मिळतंय. या जाहिरातीत मेट्रोच्या टपावर प्रवास करताना भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे चित्र दिसत आहेत.

या जाहिरातीतून मेट्रो प्रशासनाला प्रवाशांपर्यंत काय मॅसेज पोहचवचाय? ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं किती धोकादायक आहे, हे मेट्रो प्रशासन विसरलंय का? असे काही प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्त्यांनी मेट्रो प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

दरम्यान, वाद झाल्यानंतर तात्काळ मेट्रोच्या ट्विटर हॅन्डलवरून हा व्हिडिओ हटवण्यात आलाय.  

परंतु, मुंबई मेट्रोची अशीच एक जाहिरात दसऱ्याच्या निमित्तानंही पाहायला मिळाली होती. या जाहिरातीत श्रीराम मेट्रोच्या टपावरून येत रावणाचा वध करताना दिसत आहेत.  

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.