मुख्यमंत्र्यांची सुडाची भाषा हे राज्याचे दुर्दैवं : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुडाची भाषा करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैवं असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचे सुळे म्हणाल्यात.

Updated: Oct 6, 2016, 11:51 PM IST
मुख्यमंत्र्यांची सुडाची भाषा हे राज्याचे दुर्दैवं : सुप्रिया सुळे title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुडाची भाषा करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैवं असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचे सुळे म्हणाल्यात.

विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. वेळ येईल तेव्हा योग्य ती अस्त्र बाहेर काढीन या मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानावर आज विरोधकांनी तोफ डागली. कुंडल्या आहेत तर त्या बाहेर का काढा असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.

तर सुप्रिया सुळे यांनी टीका करत भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे म्हटले. आज मला बाळासाहेब ठाकरे यांची खूप आठवण येत आहे. माझे बाबा मुख्यमंत्री होते. तसेच विरोधक बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी एकमेकांवर दिलदारपणे टीका केली. मात्र, सुडाची भावना कधी ठेवली नाही. आज आपले मुख्यमंत्री सुडाची भावना ठेवतात, याचे खूप वाईट वाटत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्यात.