मुंबईत पाऊस सुरुच, मध्य रेल्वे उशिराने

 मुंबईत बुधवारपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली.

Updated: Jul 4, 2014, 10:26 AM IST
मुंबईत पाऊस सुरुच, मध्य रेल्वे उशिराने title=

मुंबई : मुंबईत बुधवारपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली.

दिवा येथे इंद्रायणी एक्सप्रेसच्या रेल्वे इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक १५ ते २० मिनिटांनी उशिरा धावत आहे.

 मुंबईत पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. मुंबईत दादर , परळ, ,सायनमध्ये पाऊस पडत आहे. तर पश्चिम उपनगरात काही ठिकाणी तुरळक पाऊस आहे. तर पावसामुळे एक्सप्रेस वेवर ठाणे - मुलुंड दरम्यान वाहतूक धिमी आहे.

तसेच दिवा येथे इंजिनात बिघाड झालेली इंद्रायणी एक्स्प्रेसही एक तास उशिराने धावत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.