कोण काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही - राऊत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जरी सारवासारव केली असली तरी भाजपमध्येही स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरू लागलीय. पण, शिवेसनेचे खासदार संजय राऊत याकडे दुर्लक्ष करत आगामी निवडणूका शिवसेना-भाजप एकत्रच लढेल, असं सूतोवाच केलंय. 

Updated: Jul 3, 2014, 11:40 PM IST
कोण काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही - राऊत title=

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जरी सारवासारव केली असली तरी भाजपमध्येही स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरू लागलीय. पण, शिवेसनेचे खासदार संजय राऊत याकडे दुर्लक्ष करत आगामी निवडणूका शिवसेना-भाजप एकत्रच लढेल, असं सूतोवाच केलंय. 

‘कोण काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही… दोन्ही पक्षांचे प्रमुख काय बोलतात ते महत्त्वाचं आहे’ असं संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेना भाजप युती मजबूत आहे असं म्हणतानाच ‘आम्ही एकत्रच विधानसभा निवडणूक लढू’ असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय.

मुंबईत सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत थेट भाषणातच भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी स्वबळावर लढण्याचा सूर लावला. ‘दरवेळी आपणच तडजोड का करायची... 1995 साली ती काळाची गरज होती... तीन पायांच्या शर्यतीचा आता कंटाळा आलाय’ असं म्हणत त्यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचाच असायला हवा, अशी आपली भावना व्यासपीठावर बोलून दाखवली. 

‘भाजपचे राज्यात 145 पेक्षा जास्त आमदार स्वबळावर निवडून आणा’ अशी सादच चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना घातलीय. भाजपचं बोन्साय करायचं आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. अन्य अनेक नेत्यांनीही त्यांची री ओढली.
पण, या सर्व चर्चेवर पडदगा टाकत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महायुती म्हणूनच विधानसभा निवडणुकांना सामोरं जाऊ, असं म्हटलंय. ‘एका दिवसात अशी युती तोडता येत नाही... विचारांवर आधारीत ही युती आहे’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.