जीवघेणी भरती प्रक्रियेची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

अग्निशमन दलाच्या जीवघेणी भरती प्रक्रियेची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आयोगाने सू मोटो दाखल करून घेत मुंबई महापालिकेला नोटीस बजावली आहे. 

Updated: Sep 6, 2016, 04:08 PM IST
जीवघेणी भरती प्रक्रियेची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल title=

मुंबई : अग्निशमन दलाच्या जीवघेणी भरती प्रक्रियेची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आयोगाने सू मोटो दाखल करून घेत मुंबई महापालिकेला नोटीस बजावली आहे. 

महापालिका आयुक्तांना २८ सप्टेंबरपर्यत सविस्तर अहवाल सादर करण्याचे  आदेश देण्यात आले आहे. १९ फूट उंचीवरून उडी मारण्याचा निकष वादात सापडला आहे. सराव नसताना एवढ्या उंचीवरून उडी मारायला लावणं मानवीय कृतीला शोभत नाही. उडी मारताना उमेदवारांच्या सुरक्षततेची काळजी का घेण्यात आली नाही ? या भरती प्रक्रियेदरम्यान २०० हून अधिक उमेदवार जखमी झाले होते. अनेक उमेदवारांचे यामध्ये हात-पायाला दुखापत झाली. 'झी २४ तास'ने ही बातमी दाखवली होती. त्यानंतर महापौरांनीही यापूर्वीच याचे चौकशीचे आदेश दिले होते.