राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी खूषखबर. दसरा-दिवाळीच्या आधी राज्य सरकारनं महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केली आहे.

Updated: Oct 15, 2015, 03:14 PM IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ title=

मुंबई : राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी खूषखबर. दसरा-दिवाळीच्या आधी राज्य सरकारनं महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केली आहे.

१ ऑक्टोबरपासून वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 

१ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीतल्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहे. सध्या महागाई भत्त्याचा दर १०७ टक्के  आहे. नव्या निर्णयानुसार सुधारीत भत्ता ११३ टक्के झालाय. वेतन संरचनेतील मूळ वेतनावर महागाई भत्त्याचा हा दर लागू असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.